आंबेमाता मंदिरात चोरी
पनवेल दि. ०४ : खारघर वसाहती मध्ये असलेल्या आंबेमाता मंदिरात अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना घडली आहे .
खारघर सेक्टर ५ मध्ये असलेल्या आंबेमाता मंदिरात अज्ञात चोरट्याने चोरी करून तेथील काही दागिने व इतर वस्तू चोरून नेल्या आहेत . याबाबतची तक्रार खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .