अंभोरा येथील युवकाच्या कार्यत्परतेने वाचले शेतकऱ्यांचे प्राण- सचिन आमले यांचा सत्कार संपन्न
पनवेल (रायगड )
समजामध्य मध्ये अनेक सामाजिक कार्य करणारे युवक वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करतात .काही युवक या कामामध्ये स्वत: ला झोकून देऊन समाजाच्या उपयोगी पडतात .अशाच एका अंभोरा येथील सचिन आमले नामक युवकाने एका शेतकऱ्याला घोणस नावाचा साप चावल्यानंतर तातडीने दवाखान्यात नेल्यामुळे त्या शेतकऱ्याचे प्राण वाचले .त्यामुळे या शेतकर्यांच्या वतीने सचिन आमले यांचा सत्कार करण्यात आला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की काशिनाथ लहानू आमले वय 60 गाईच्या गोठ्यामध्ये पाणी पाजत असताना घोणस नावाच्या अतिविषारी सापाने दंश केला .सापाने दंश केल्यानंतर काशिनाथ आमले हे स्वत च्या मोटारसायकलवर गावामध्ये आले . गावामध्ये आल्यानंतर चक्कर येऊ लागले त्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात हलविणे गरजेचे होते .सचिन आमले या युवक कार्यकर्त्याने अतिशय तत्परतेने काशिनाथ आमले यांना चिचोंडी पाटील येथील सरकारी दवाखान्यात स्वत च्या मोटारसायकलवर नेले .मात्र त्या ठिकाणी सांगितले की यांना सर्पदंश झाल्यामुळे नगर येथील सरकारी दाखवण्यामध्ये नेणे अत्यंत गरजेचे आहे . सचिन आमले तरुणाने क्षणाचाही विलंब न करता फोर व्हिलर उपलब्ध करुन चिचोंडी पाटील या ठिकाणाहून त्यांना अहमदनगर येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये अतिशय कमी वेळेत नेल्यामुळे काशिनाथ आमलेचे प्राण वाचले .हॉस्पीटलमध्ये जाईपर्यंत बऱ्याच प्रमाणात विषाचा परिणाम त्यांच्या शरीरावर झाला होता .डॉक्टरांनी सांगितले अगदी पंधरा वीस मिनिटे उशीर झाला असता तर त्यांचे प्राण वाचवणे कठीण झाले असते .त्यामुळे युवक कार्यकर्ते सचिन आमले यांनी कार्यतत्परता दाखवल्यामुळे काशिनाथ आमले यांचे प्राण वाचले त्यामुळे सर्वत्र त्याचं कौतुक होत आहे .काशीनाथ आमले शेतक-याच्या वतीने सचिन आमले यांचा सत्कर्म केल्याबद्दल ह. भ.प.दिपिकाताई देवळीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ग्रामस्थ उपस्थीत होते.