कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांनी करून घेतली मैदानाची स्वच्छता
पनवेल दि २८ : कामोठे वसाहती मधील कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांनी मैदानातील साचलेला कचरा तातडीने जेसिबी लावून काढून घेतला व अबालवृद्धां साठी सदर मैदाने खुले करून दिले.
कामोठे वसाहती मधील सेक्टर ३६, या ठिकाणी असलेल्या तुकाराम मंदिर समोरील मैदानात मोठ्या प्रमाणात घाण साठली होती तसेच रानटी गवत वाढले होते त्यामुळे या मैदानाचा वापर अबालवृद्धांना करता येत नव्हता या बाबतची माहिती स्थानिक रहिवासीयांनी कार्यतत्पर नगरसेवक विकास घरत यांना देता च त्यांनी त्वरित त्या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत जाऊन तेथे जेसीबी लावून मैदानातील साचलेला कचरा व इतर रानटी गवत काढून दिले व सदर मैदान वापरासाठी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक रहिवासीयांनी नगरसेवक विकास घरत यांचे आभार मानले आहे.
फोटो – नगरसेवक विकास घरत मैदान स्वच्छ करून घेताना उपस्थित