सद्गुरू श्री नाना महाराज परांजपे यांचा शताब्दी जन्मउत्सव सोहळा पनवेल मध्ये संपन्न
पनवेल दि.२९ : पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ (मठ) मंदिर, गावदेवी पाडा, पनवेल येथे सद्गुरू श्री नाना महाराज परांजपे यांचा शताब्दी जन्मउत्सव सोहळा स्वामी सेवकांनी विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाद्वारे पार पडला.
यानिमित्ताने नामस्मरण सोहळा, श्री स्वामी समर्थ महिला मंडळाचे भजन, श्री स्वामी समर्थ सहस्त्रनामावली, जन्मउत्सव सोहळा तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप शास्त्रकार अभिषेक, प्रवचन व महाआरती गुरुवर्य मठाधिपती प.पु. सुधाकर (भाऊ) घरत यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.
फोटो : सद्गुरू श्री नाना महाराज परांजपे यांचा शताब्दी जन्मउत्सव सोहळा