युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे आदिवासी फणसवाडी येथील दोन वर्षापासुन बंद असलेली वीज जोडणी पुन्हा सुरु
पनवेल दि.२९ : पनवेल जवळील खारघर हिल्सवर अस
लेल्या आदिवासी फणसवाडी येथील विजेच्या खांबाची विजजोडणी मागील दोन वर्षापासुन बंद होती. युवासेनेच्या पाठपुराव्यामुळे या विजेच्या खांबाची विजजोडणी पुन्हा सुरु करण्यात आली असून त्या स्ट्रीटलाईटचे युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत हस्ते उदघाटन करण्यात आले
पनवेल महानगर पालिकेच्या अंतर्गत येणार्या आदिवासी वाड्यांमधील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणा-या आदीवासी नागरिकांना भेडसावत असलेल्या प्राथमिक सोयी सुविधांच्या समस्यांबाबत युवासेनेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले होते. तसेच यांवर सातत्याने युवासेनेने पाठपुरावा केला. अखेर त्याला यश आले असून या विजेच्या खांबाची विजजोडणी पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्याचे उदघाटन युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी युवासेना उपविधानसभा अधिकारी अनिकेत पाटील, खारघर शहर अधिकारी विनोद पाटील, युवासेना प्रभाग अधिकारी विजय रोकडे, गुरुनाथ सपरे यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थीत होते.
फोटो : युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत हस्ते स्ट्रीटलाईटचे उदघाटन