देवाने दिलेल्या अनमोल जीवन दु:खात न घालवता मजेत जगायला शिका-ह.भ.प. दादा महाराज शेळके
अंभोरा( प्रतिनिधी)माणसाला जीवनामध्ये सुखी व्हायचे असेल तर अपेक्षा वाढू देऊ नका अपेक्षांचे ओ़झे वाढले अपेक्षापूर्ती झाली नाही की दु: ख होतं दु:खाचे मूळ कारण आहे त्यामुळे अपेक्षांचं ओझं ठेवू नका मात्र प्रयत्न करीत रहा ईश्वर नामाचं चिंतन करा आयुष्यात तुम्हाला नक्कीच सुखाचा मार्ग सापडेल असे प्रतिपादन ह.भ.प. दादा महाराज शेळके यांनी अंभोरा येथे दशक्रीया विधी निमित्त प्रवचन करताना काढले
आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील अॅडव्होकेट अंबादास आमले यांचे हृदयविकाराच्या आजाराने त्यांचे निधन झाले त्यांच्या दशक्रिया निमित्त दादा महाराज शेळके यांचे प्रवचन संपन्न झाले .कै.अॅड .अंबादास शंकरराव आमले हे अहमदनगर येथील जिल्हा न्यायालयात न्यायालय व कामगार न्यायालयात वकील म्हणून कार्यरत होते .अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले हाेते .आपल्या भावंडांचे शिक्षण करून संपुर्ण कुटूंब त्यांनी रेघा रुपाला लावले होते .गावातील प्रत्येक माणसांशी मनमोकळेपणाने बोलणारे व गोरगरिबांना अडचणीच्या काळात मदत मदतीचा हात देणारे कै.अॅडव्होकेट अंबादास आमले यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे कै. अॅड. अंबादास आमले यांच्या दशक्रिया विधी निमित्त बोलताना ह.भ.प. दादा महाराज शेळके म्हणाले की जिवनामध्ये आपल्या कार्यक्षमता पेक्षा जास्तीचे अपेक्षा ठेवली तर माणसाच्या वाट्याला नेहमीच दु ख येतं करण ठरवलेली अपेक्षा पूर्ण होत नाही अपेक्षा का केल्या जातात आणि त्याचा जर विचार केला तर लक्षात येतं की अनेकदा आपल्याला ताण सहन करण्याची इच्छा नसते नव्हे बहुतांश वेळा आपण सर्वच गोष्टी सहज आणि सोप्या कसे साध्य करता येतील याचा विचार आपण करतो .मात्र आपल्या कार्यक्षमते पेक्षा अपेक्षा ठेवल्या किंवा दुस-या कोणकडुन ठेवलेल्या अपेक्षांचा भंग झाला की माणसाच्या पदरात दु खं पडते .विनाकरण माणूस दु :खी होतात. जीवनातला आनंद घ्यायचा असेल तर आहे त्यात समाधान मानून प्रयत्न करीत राहिलं तर नक्की यश आपल्या पदरी पडते .त्यामुळेच जीवन हे पाण्याचा बुडबुडा आहे कधी आपण काळ रुपी प्रवाहाबरोबर वाहून जाऊ हे सांगता येत नाही त्यामुळे देवाने दिलेल अनमोल हजीवन अतिशय आनंदात मजेत आणि सुंदररीत्या जगलं पाहिजे .या दशक्रिया विधीसाठी अनेक क्षेत्रांतून मान्यवर उपस्थित होते