मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेच्या पुणे लेनवर झालेल्या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू
पनवेल दि.०१: मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर पुणे लेनच्या दिशेने अशोक लेलॅन्ड ट्रक क्र.MH 40 BL 5569 चालक एम.हनुमंत शरणप्पा वय.38 वर्षे रा.कर्नाटक हे पुणे बाजूकडे दुसरे लेनने जात असताना त्याचे पाठीमागून आलेला अशोक लेलॅन्ड 1615 HE टेम्पो क्र.MH 01 DR 1347 वरील चालक सुभाषचंद्र गौतम वय.41वर्षे रा.टिटवाळा-कल्याण,जिल्हा.ठाणे यांचा त्यांच्या गाडीवरील त्यांचा ताबा सुटून पुढे जाणाऱ्या अशोक लेलॅन्ड ट्रकला धडकला.
सदर अपघातात अशोक लेलॅन्ड वरील चालक सुभाषचंद्र गौतम हा अत्यंत गंभीर जखमी झाला व तो टेम्पोमध्ये अडकला होता. त्याला देवदूत रेस्क्यू टीम व आय.आर.बी. स्टाफच्या मदतीने त्यांना बाहेर काढून तात्काळ आयआरबी ऍम्ब्युलन्स मध्ये डॉक्टर यादव यांनी तपासण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले आहे. मयत सुभाषचंद्र गौतम यांचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी खाजगी रुग्णवाहिकेने पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. अपघातग्रस्त टेम्पो आयआरबी क्रेनच्या साह्याने रस्त्याचे बाजूला घेवून सुरक्षित ठिकाणी उभे करण्यात आले आहे. यावेळी पीएसआय केसरकर, पळस्पे मोबाईल स्टाफ, पनवेल तालुका पोलीस स्टेशन एपीआय भोईर यांच्यासह देवदूत रेस्क्यू टिम व IRB कंपनी स्टाफ हजर होते.पुढील कारवाई पनवेल तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.