खिडकीवाटे आत प्रवेश करून मोबाईल चोरणारा गजाआड
पनवेल दि.1 : पनवेल जवळील करंजाडे येथील एका इमारतीच्या ब्लॉकमध्ये खिडकीवाटे आत प्रवेश करून घरातील मोबाईल फोन व इतर साहित्य चोरणार्या चोरट्यास पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले आहे.
करंजाडे येथील सेक्टर 5 येथे राहणार्या शिवानी सावंत यांच्या दुसर्या मजल्याच्या घरामध्ये खिडकीद्वारे आरोपी बिरेंद्र रामबहोर इद्रा (20) हा आत शिरुन त्याने घरात असणारे मोबाईल फोन व इतर साहित्य असा मिळून जवळपास 29 हजाराचा ऐवज चोरुन नेला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वपोनि विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे, पोलीस हवालदार राऊत, पो.ना.परेश म्हात्रे, देशमुख, वायकर, पारधी, पो.शि.पारासूर, घरत आदींच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे सदर आरोपीबद्दल माहिती घेवून त्याला ताब्यात घेतले असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.