*मोहपाडा येथील राजवाडा ग्रुपच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न*
रसायनी दि. ९) रसायनी-मोहोपाडा येथील राजवाडा ग्रुपच्या वतीने गणपती उत्सवानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन मोहोपाडा बाजारपेठेतील दत्त मंदिरात गुरुवार दि. ८सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते.
पनवेल येथील सुप्रसिद्ध डॉ.सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन राजवाडा ग्रुप च्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते. राजवाडा ग्रुप दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. यंदाही गणेश उत्सवानिमित्त राजवाडा ग्रुपच्या वतीने रसायनी पंचक्रोशीतील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम राजवाडा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या शिबिरामध्ये जवळपास शेकडोहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. तपासणीअंती महिला व पुरुष मिळून ४१ जन मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले. जे मोतीबिंदूचे रुग्ण आढळून आले त्यांच्यावर पनवेल येथील लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार असल्याचे लक्षमी चॅरिटेबल ट्रस्टचे समन्वयक श्री.विनोद पाचघरे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. यावेळी लक्ष्मी चारिटेबल ट्रस्टचे श्री. विनोद पाचघरे, नेत्रतज्ञ डॉ. श्रद्धा पटेल, डॉ. उपासना मोकल, नेत्र चिकित्सक डॉ. प्रीती चव्हाण, डॉ.पूजा बोडके, डॉ.वैष्णवी बुचके, यांचे विशेष सहकार्य लाभले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजवाडा ग्रुपचे अध्यक्ष श्री.संदीप म्हात्रे, गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. विनोद पाटील, अमित बोरकर, प्रवीण जुनघरे, खजिनदार भूषण पाटील, समीर म्हात्रे, निलेश महाडिक, अंबुल कनोजिया, उमाकांत भोईर,आदींनी विशेष मेहनत घेतली.