*काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात- प्रा. जोगेन्द्र कवाडे यांची नागपुरात घोषणा*
*भीमसैनिकांच्या राष्ट्रीय मेळाव्यात प्रा कवाडे यांची राष्ट्रीय अध्यक्ष पदी तर राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी जयदीप कवाडे यांची निवड*
पनवेल प्रतिनिधी
गेल्या दिड दशकापासून कॉंग्रेस आघाडीमध्ये मित्रपक्ष म्हणून काँग्रेस पक्षाने सम्मानपूर्वक सत्तेत वाटा देत आपले राजकीय मित्रत्व जपून आघाडीचा धर्म न पाळता पीपल्स रिपब्लिकन पक्षाची सातत्याने उपेक्षा करून जो विश्वासघात केला आहे, त्यामुळे कॉंग्रेस सोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी केली.
यापुढे विश्वासघात करणाऱ्या पक्षासोबत आघाडी न करता आगामी काळातील सर्व निवडणूका या स्वबळावर लढविल्या जाणार असल्याचे सांगतानाच इतर राजकीय पक्षा कडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचार देखील केल्या जाईल अशी स्पष्ट भूमिका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खा. प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी
नागपूर येथे पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित -सांस्कृतीक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेळावा आयोजित करण्यात आला होता .
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला लाँगमार्च प्रणेता, माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या हजारो भीमसैनिकांच्या उपस्थितीत मेळाव्याला संबोधीत करतांना पक्षाध्यक्ष प्रा. जोगेन्द्र कवाडे पुढे म्हणाले की, देशभरात विघटनवादी प्रवृत्तीचा धुमाकुळ चालू आहे. त्यांच्या धार्मिक उन्मादामुळे राष्ट्रीय एकात्मता व अखंडतेला बाधा पोहचत आहे. केन्द्र सरकार है, देखिल सं विधानिक नाही तर आर. एस. एस. चा अजेंडा राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिले संविधान बदलवू पाहत आहे. सांस्कृतीक दहशतवादाच्या माध्यमातून दहशतवा पसरवून दलित, मागासवर्गीय, आदीवासी, अल्पसंख्याक समुदायांना लक्ष करून त्यांचेवर अत्याचार केले जात आहे. लोकशाहीला संपुष्टात आणून हुकूमशाही प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. आणि म्हणूनच देशात फोफावत चाललेल्या सांस्कृतिक दहशतवादाचा बिमोड करण्याचा संकल्प करून संविधान वाचविण्या साठी भीमसैनिक आपल्या प्राणाचे मोल देण्याची तयारी ठेवली. संविधानाचे रक्षण करतील याची जाणिव घटना बदलवू पाहणान्या धूमधा’ ठेवावी असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना प्रा. जोगेन्द्र कवाडे ठणकावून सांगितले.
पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्यावतीने पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते जयदीप कवाडे यांनी निमंत्रीत केलेल्या ‘सांस्कृतीक दहशतवाद बिमोड भीमसैनिक मेव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गोपावराव आटोटे यांचे हस्ते करण्यात आहे आलेल्या या भव्य मेळाव्यात प्रामुख्याने प्रा. जोगेन्द्र कडे यानी – सामाजीक /आर्थीक / मुद्यांवरही आपले विचार व्यक्त करतांना म्हंटले की, यापूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारने मागासवर्गीय कर्मचान्याच्या पदोन्नती असलेले 33 टक्के आरक्षण रद्द करण्याचा जो निर्णय घेतला आहे. सामाजीक अन्याय केला त्या संबधाने बोलतांना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने जे निर्णय घेतले होते तेच निर्णय आताच्या विद्यमान शिंदे + फडणविस सरकारनी रद्द करण्याचे जाहीर केल्या प्रमाणे केल्या जात आहे. त्याप्रमाणेच मागासवर्गीयाच्या पदोन्नतीतील आरक्षण हटविण्याचा निर्णय घेणल्या गेला होता. तो निर्णय देखिल रद्द करून पदोन्नतीतील 33 टक्के आरक्षण पूर्ववतच करावे ,अशी मागणीही करीत विद्यमान सरकारक या मागणी संबधाने दुर्लक्ष केल्या गेल्याचे चित्र दिसत आहे, याच्या विरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टी व्दारा आंदोलन छेडल्या जाण्याचा इशाराही यावेळी प्रा. कवाड सर यांनी दिला आहे.
प्रामुख्याने भीमसैनिक मेव्याचे निमित्ताने पक्षाच्या वतीने ११ ठराव पारीत करण्यात आले १) वाढल्या अत्याचारास प्रतिबंध घालणे आणी अॅट्रॉसिटी कायद्याची कठोर अमंलबजावणी, बेरोजगारीची समस्या दुर करणे, मागासवर्गीय कर्मचान्याचे नोकरीतील 33 आरक्षण पूर्ववत चालू करणे शिक्षणाचे राष्ट्रीयकरण करणे, खाजगीकरणाचे कारस्थान थांबविणे. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणे, महागाई नियंत्रीत करणे, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्याना सरसकट आर्थीक मदत करणे. आगामी निवडणुका घ्या खबभवर उढविणे. संविधानाचे रक्षणार्थ तथा सांस्कृतीक बिमोड करण्या साठी- कोल्हापूर ते चैत्यभूमी आणि शेवटचा ठराव, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व कार्याध्यक्ष घोषीत करणे.
भीमसैनिकाच्या राष्ट्रीय मेनव्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय अध्यक्षपदी पुढील वर्षा करीता माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे सर या फेर निवड करण्यात येत असल्याचे घोषीत करण्यात आले तर राष्ट्रीय कार्याध्य युवानेते भाई जयदीप कवाड यांची फेर निवड करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले तेव्हा या निवडीचे उपस्थित भीमसेनीकांनी टाळ्याच्या आवाजात – प्रा. जोगेन्द्र कवाडे सर आगे बढो हम तुम्हारे साथ हैं। युवानेते जयदीप भाई आगे बढो च्या जोरदार घोषणा देवून स्वागत केले.
यावेळी मंचावर युवा नेता जयदीप कवाडे, जे. के. नारायण, गणेशभाई उन्हवण, चरणदास इंगोले, बापुसाहेब गजभारे, प्रमोद टाले. विजय वाघमारे, छत्रपालसिंह (हरियाणा), राजकिशोर आनंद (नवी दिल्ली), रशभाई सोनवणे (गुजरात), इंद्रजित घाटे, हर्षवर्धन नवघरे भगवान आढाव, सचिन तांबे प्रा, पुरुषोत्तम पाटील, अनिल तूरुकमारे, नरेंद डोंगरे, दिलीप भिसे, दौलत हिवराळे, युवराज कांबळे, मेघराज डोंगरे, राजेश जाधव, भगवान कामळे, महिला आघाडीच्या सुवर्णा वानखेडे, सविताताई नारनवरे, मिनाबाई अलिंग, संजय खांडेकर, प्रा. मुनेश्वर बोरकर, अरुण वाहने, सुमेध मुरपाठकर च्यासह विविध राज्यातून आलेले नेते उपस्थित होते.