कामोठे वसाहतीमधील नागरी समस्ये बाबत शिवसेना आक्रमक
पनवेल दि. ०३ : कामोठे शहरातील गंभीर समस्याबाबत शिवसेना आक्रमक झाली असून पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी लक्ष घालावे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे .
शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना शहरप्रमुख कामोठे शहर राकेश गोवारी यांच्या सहकार्याने आज सचिन मनोहर त्रिमुखे (शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर) यांनी आयुक्त, गणेश देशमुख ,पनवेल महानगरपालिका यांची भेट घेतली. व त्यावेळी कामोठे वसाहतीमधील नागरी समस्यांचा पाढा त्यांच्या समोर मांडण्यात आला . त्यामध्ये शहरात प्रत्येक सेक्टरमध्ये परिसरातील राहणाऱ्यांची लोकसंख्या फार मोठी प्रमाणात वाढली असून तसेच या सेक्टर मध्ये सांडपाणी वाहून नेणारे मलनिसारानं वाहिन्या यांची क्षमता छोटी असल्या कारणाने दरवषी सांडपाणी रस्त्यावर आलेले निदर्शनास येते तरी पनवेल महानगर पालिका तर्फे कामोठे शहरासाठी जेट्टींग मशीन २ संख्या, पॉवर बकेट २ संख्या आणि मलनिसारानं वाहिन्यातुन मळ काढण्यासाठी लागणारी सक्शन गाडी २ संख्या अशा प्रकारे कामोठे शहरासाठी उपलब्ध करून द्यावेत. कारण कामोठे मधील संदर्भात पनवेल महानगर पालिका कडे आता सध्या एकच जेट्टींग मशीन,सक्शन गाडी आणि पॉवर बकेट असून ती कधी हि खराब होउन त्यात काम निघते आणि एक हफ्ता मशीन बंद असल्यामुळे काम होत नाहीत त्यामुळे रहिवाश्याना खूप त्रास सहन करावा लागत आहेत . कामोठे मधील हा खूप खंबीर प्रश्न आहे आपण लवकरात लवकर निर्णय घेउन समस्या सोडवावी.तसेच कामोठे शहरातील सर्वच सेक्टर मध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावरील तसेच सार्वजनिक ठिकाणचे बंद अवस्थेत असणारे स्ट्रीट लाईट दिवे पोल नंबर सहित डिटेल देऊन पण अधिकारी दखल घेत नाहीत.वारंवार पाठपुरावा करून सुद्धा कामे होत नाहीत.काही ठिकाणी तर एवढा अंधार असतो की महिलांना तेथून येजा करण्यासही भीती वाटते.एखादा अनुचित प्रकार घडण्याच्या आदी तसेच जोरात पाऊस सुरू व्हायच्या अगोदर दोन तीन दिवस रात्री सर्वेक्षण करून जेणेकरून लाईट सुरू असताना हे काम तातडीने करून घ्यावे त्याचप्रमाणे आपल्या अधिकारामध्ये असलेल्या कामोठे सेक्टर-३४, प्लॉट न -४० या प्लॉट वर लहान मुलासाठी खेळण्यासाठी आणि ६० वर्षांच्या वरती जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी ओपन गार्डन बनण्यात यावेत आणि हा प्लॉट सिडको तर्फे गार्डन साठी आरक्षण केलेला आहे.प्रभाग क्र – १३ मध्ये सेक्टर -१७, १८, ३४, ३५ आणि ३६ या सेक्टर मध्ये कुठेही गार्डन नसून नागरिकांना आणि लहान मुलांना सेक्टर- २० येथे जावे लागत आहे, खासदार निधीतून लवकरात लवकर आपण कामोठे इथे गार्डन बनवून द्यावेत व पनवेल महानगर पालिकेच्या आपल्या क्षेत्रात येणारे कामोठे शहरातील कोरोना काळात जे महिला विधवा झाले आणि आज त्यांच्या पाठीशी कोण नाही आहेत, लहान मुलांना त्यांना संभाळाचे जिमेदारी आहेत अश्या महिलांना पनवेल महानगर पालिका तर्फे रोजगार निर्माण करून द्यावेत आणि कोरोना काळात ज्यांचे नोकरी गेल्या आहेत त्यांनी आपली घर विकून मुलांना आणि आपल्या आई वडिलांना सांभाळलं त्यांना अजून नोकरी अजून भेटली नाही अश्या गरजू मुलांना पनवेल महानगर पालिका मध्ये कंत्राट बेस वर शिपाई, सफाई कामगार आणि इत्तर विभागात कामावर घ्यावे. कोरोना काळात रहिवासाचे खूप वाईट परिस्थिती आली आहे. आता कुठे खंबीरपणे उभे राहिले आहेत अजून तुमची पण साथ भेटली तर खूप मोल्याचे काम होईल तरी लवकरात लवकर याच्या वर विचार करून मार्ग काढावे.कामोठे शहरात मानसरोवर स्टेशन ते कळंबोली (बस क्र-५६) या मार्गवर नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमचे जे पण बस थांबा आहेत ते बस स्टॉप वर बसावयाचे आसन, शेड बांधून कायम स्वरूपी उभारावे. आता ज्या अवस्थेत बस थांबा आहे त्यामुळे रहिवाशींना पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात खूप त्रास होत आहे. ६० वर्षांच्या वरती आणि अपंग वक्तीना पण खूप त्रास सहन करावा लागत आहे. हेच बस थांबा कायम स्वरूपी करून द्यावेत . त्यामुळे कामोठे शहरातील रहिवाशींना त्रास कमी होईल. अन्यथा तेथील नागरिक आणि रहिवाशी मोर्चा काढण्याच्या विचारात आहे. कृपया सहकार्य करून लवकरात लवकर मार्ग काढावा अशी मागणी सचिन मनोहर त्रिमुखे(शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर) यांनी केली आहे . त्यावेळी संजय जंगम (शिवसेना विभाग संघटक) आणि सुरेश मोरे (शिवसेना शाखा प्रमुख) हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो – आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देतांना सचिन मनोहर त्रिमुखे(शिवसेना उपशहर प्रमुख कामोठे शहर) यांनी केली आहे . त्यावेळी संजय जंगम (शिवसेना विभाग संघटक) आणि सुरेश मोरे (शिवसेना शाखा प्रमुख) हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.