पनवेल महापालिका क्षेत्रात एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.महानगरप्रमुख प्रथमेश सोमण यांनी दिली माहिती.
पनवेल /प्रतिनिधी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आरोग्य दिन म्हणून साजरा करण्याचे पक्षादेश होते. सरकारी पातळीवर ही विविध आरोग्य उपक्रम राबवत शासनातर्फे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. पनवेल महापालिका क्षेत्रात पनवेल शहर, कामोठे विभाग, खारघर, कळंबोली नवीन पनवेल इत्यादी ठिकाणी आरोग्य तसेच इतर संबंधित उपक्रम मोठ्या प्रमाणावर व यशस्वीरित्या राबवून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला अशी माहिती महानगर प्रमुख माजी नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी दिली.
खारघर शहरप्रमुख प्रसाद परब यांच्या नेतृत्वात खारघर मधील गिरीजा वृद्धाश्रमात फळे व औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. पनवेल शहरात शहरप्रमुख प्रसाद सोनवणे व शहर संघटक अभिजीत साखरे यांच्या नेतृत्वात उन्नती हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर व औषधे वाटप चे आयोजन करण्यात आले होते. पनवेल येथील शुश्रुषा हॉस्पिटल मध्ये सरकारी योजनेअंतर्गत युवा सेना राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य रुपेश पाटील व उपमहानगर प्रमुख रोशन पवार यांच्या पुढाकाराने मोफत एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी, टू डी इको इत्यादी तपासणी करून देण्यात आली. कामोठे विभागात शहरप्रमुख सुनील गोवारी यांनी शिवसेना व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी तथा नेत्र तपासणीचे भव्य शिबिर आयोजित केले होते. महिला आघाडीच्या महानगरप्रमुख सौ सुलक्षणा जगदाळे यांनी देखील खास महिलांसाठी आरोग्य तपासणीच्या शिबिराचे आयोजन केले होते. नवीन पनवेल शहरप्रमुख श्री शिवाजी थोरवे यांनी देखील विविध सरकारी दाखल्यांचे वाटप मुख्यमंत्री यांच्या निमित्ताने जाहीर केले असून येत्या आठवड्यात सुट्टीच्या दिवशी सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे यांनीही बाळासाहेबांची शिवसेनेच्या सूचना फलकांचे अनावरण केले. कळंबोली मध्ये ही संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वात आरोग्य तपासणी शिबिर व पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. कामोठे मध्येही शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत देखील उपस्थित होते. या सर्व उपक्रमांचे उद्घाटन भाजपाचे पनवेलचे आमदार प्रशांत दादा ठाकूर, संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, माजी नगरसेवक नितीन पाटील इत्यादी मान्यवरांनी केले. महापालिका क्षेत्रातील हे सर्वच उपक्रम यशस्वी ठरले असून हजारो नागरिक व रुग्णांनी याचा लाभ घेतल्याची माहिती सोमण यांनी दिली.