आदीवासी बांधवांना हक्क अधिकाराची जाणीव देणारा पत्रकार
पनवेल/ प्रतिनिधी :
रायगडसह राज्यातील आदीवासी बांधवाना त्यांच्या हक्क अधिकारांची जाणीव करून देऊन त्यांना अन्यायाविरुद्ध न्याय मार्गाने लढण्यास जागृत करणाऱ्या पनवेलच्या तरुण तडफदार पत्रकार व आदिवासी सम्राट साप्तहिकाचे संपादक गणपत वारगडा यांचा वाढदिवस १ एप्रिल रोजी पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्यावतीने शासकीय विश्रामगृह या ठिकाणी हा वाढदिवस साजरा झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी पत्रकार गणपत वारघडा यांच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित सर्व पत्रकारांनी गणपत वारघडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनवणे, कार्याध्यक्ष पत्रकार संजय कदम, सचिव तथा दैनिक लोकमतचे मयूर तांबडे, खजिनदार हरीश साठे, संघर्ष समितीचे सल्लागार AD. मनु सचदेव, पत्रकार भरत कांबळे, रायगड सम्राटचे संपादक शंकर वायदंडे, आपले रायगडचे संपादक सुनील वारघडा, रायगड टाइम्सचे पत्रकार राम बोरीवल, सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी उपस्थित होते.
गणपत वारगडा यांच्या वाढदिवसानिमित्ताने सांगठोली येथील जनाधर्मा वृद्धाश्रम या ठिकाणी फळ वाटप करून आर्थिक मदत देण्यात आली. आदिवासी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष राजेश भल्ला, तालुकाध्यक्ष संजय चौधरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश पारधी, युवा सामाजिक कार्यकर्ता दत्ता झुगरे यांची येथे उपस्थिती होती.
तसेच यावेळी लोकनेते, मा. खासदार रामशेठ ठाकूर, लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या उपस्थितीत मालडुंगे विभागातील वाघाची वाडी येथे मंजूर झालेल्या विकासकामाचे भूमिपूजन पत्रकार गणपत वारगडा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष राजेश भोईर, ग्रामपंचायतचे सरपंच हर्षदा सोमनाथ चौधरी यांचे पती सोमनाथ चौधरी, माजी उपसरपंच काळूराम वाघ, ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य जनार्दन निरगुडा, काळूराम कामडी, कंत्राटदार मयूर कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त अनेकांनी पत्रकार गणपत वारघडा यांना मोबाईलवरून शुभेच्छा दिल्या..