पत्रकार मित्र असोसिएशनच्या लाक्षणिक उपोषण पत्राची दखल नवी मुंबई अध्यक्ष राहुल बोर्डे यांच्या उपोषणाच्या ईशाऱ्यानंतर कंत्राटदाराकडून गॅसदववाहिनी सुरु
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल महापालिका हद्दीतील स्मशानभूमीमध्ये लाकडांवर स्थानिकांना 2500 रुपये तर बाहेरील नागरिकांना 4200 दराप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात येत असून याकरिता नागरिकांची लूट सुरु असून पनवेल महापालिकेने हा ठेका उत्कर्ष सामाजिक संस्थेला दिला असून ठेकेदार यामध्ये मालामाल होत असल्याचे वृत्त प्रसिद्ध करून याबाबत पत्रकार मित्र असोसिएशन या सामाजिक संस्थेने लाक्षणिक उपोषणाचा इशारा नवी मुंबई अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांनी पत्र देऊन दिला होता. पनवेल महापलिका हद्दीतील अमरधाम व पोदी येथील स्मशानभूमीमध्ये गॅसदववाहिनीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त 100 रुपये दर आकरला जातो मात्र तेच लाकडासाठी 2500 रुपये दर आकारला जातो कंत्राटदारांनी जनतेच्या फायद्याची गॅसदववाहिनी मुद्दामहून बंद केली होती असा आरोप पत्रकार मित्र असोसिएशनचे नवी मुंबई अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांनी केला होता व त्यानुसार गॅसदववाहिनी सुरु न झाल्यास लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला होता. राहुल बोर्डे यांच्या इशाऱ्याने पालिका अधिकारी व कंत्राटदार यांना जाग येऊन त्यांनी त्वरित सर्व स्मशानभूमीमधील गॅसशवदहिनी सुरु केली.
याबद्दल पत्रकार मित्र असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष केवल महाडिक व राहुलजी बोर्डे यांनी पनवेल महापालिका आयुक्त मा.श्री.गणेशजी देशमुख व कंत्राटदार यांचे आभार मानून तूर्तास हे लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचे पत्र देखील मेलद्वारे पाठवण्यात येणार असल्याचे देखील नवी मुंबई अध्यक्ष राहुलजी बोर्डे यांनी माहिती देताना सांगितले.