तळोजा एमआयडीसी येथून इसम बेपत्ता
पनवेल दि.११ (संजय कदम ) : तळोजा एमआयडीसी येथे कामास जातो असे सांगुन घराबाहेर पडलेला मुंबईतील रहिवाशी पुन्हा घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
बाळाजी इंगळे असे या इसमाचे नाव असून त्यांचे वय ५० वर्षे असून त्यांचा चेहरा गोल, अंगाने मजबुत, केस पांढरे, उंची 5 फुट अंदाजे, डोळे काळे, नाक सरळ आहे. त्यांच्या उजव्या भुवयांच्या वरच्या बाजुला जखमीचे खुन असून अंगात पांढ-या रंगाचे फुल शर्ट व चॉकलेटी रंगाची पॅन्ट घातलेली आहे. त्याचप्रमाणे डाव्या हाताच्या मनगठावर जय भीम असे गोंदलेले तसेच डाव्या छातीवर अशोक चक्र मध्ये जय भीम असे गोंदलेले आहे. त्यांना भाषा मराठी, हिंदी बोलता येते. सदर इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे किंवा पोलीस उपनिरीक्षक बळीराम घंटे (मो.नं. 7972134193) यांच्याशी संपर्क साधावा.