शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त पनवेल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वर्सेस योद्धा म्हणून सत्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज सकाळी करण्यात आला त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील, जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, कार्याध्यक्ष डॉक्टर शिवदास कांबळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सौ साक्षी भगत, सूरदास गोवारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
