सारसोळे नेरुळ से. ६ मधील पदपथावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण
नवी मुंबई प्रतिनिधी: नवी मुंबई प्रांतातील नेरुळ हे ठिकाण रहिवासी दृष्टीने जनतेच्या पसंतीस उतरलेलं ठिकाण आहे. नेरुळ रेल्वे स्टेशन आणि त्याला लागूनच असलेला निवासी परिसर नेरुळ मधील नागरिकांच्या सोयीचा ठरतो. सारसोळे परिसर हा नेरुळ स्टेशन पासून पायी चालण्याच्या अंतरावर आहे. तसेच या ठिकाणी असलेला सारसोळे बस डेपो , सहकार बाजार , सुनियोजित कुकशेत गाव या मुळे सारसोळे या भागात सतत नागरिकांची वर्दळ असते. सारसोळे या भागात निवासी इमारती हि पुष्कळ संख्येने आहेत. सारसोळे सेक्टर सहा ओम शिवम आर्पामेट व साईधाम सोसायटी प्लाँट नंबर १४० , १४१ येथे निवासी इमारतीला लागूनच आनधकृत फेरीवाले यांनी ठिय्या मांडला आहे. हे फेरीवाले कोरोना काळातही कोणते नियम पाळताना करतांना दिसत नाही तसेच रविवारी या ठिकाणी गर्दी वाढल्यामुळे नागरिकांना येण्या जाण्या करिता अडचण होत असल्याचे सामाजिक भान जपणारे मुंबई जिल्हा कॉग्रेस कमिटी चे सचिव विरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे विरेंद्र म्हात्रे यांनी याबद्दल संबंधित नवी मुंबई आयुक्त अभिजित बागंर व नेरुळ वार्ड अधिकारी दत्तात्रय नागरे यांच्यासोबत पत्रव्यवहार हि केल्याचे सांगितले आहे.

