गोवठणे गावातील सेव्हन स्टॅंडर्ड क्रेझी बडीज ग्रुप तर्फे पूर्ण गावात जंतू नाशक लिक्विड फवारणी.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील गोवठणे गावातील -सेव्हन स्टॅंडर्ड क्रेझी बडीज ग्रुप सन 1989/90 तर्फे पूर्ण गोवठणे गावात जंतूनाशक लिक्विड फवारणी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळचे 5 वाजेपर्यंत नॉन स्टॉप करण्यात आली.यात भूक तहान विसरून विशेषतः तरुण वर्गांनी पुढाकार घेऊन हे सामाजिक बांधलकीच्या उद्देशाने कार्य केले.
आमच्या ग्रुप तर्फे वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबविली जातात मात्र सध्या कोरोना सारख्या जीवघेण्या महाभयंकर साथीच्या रोगापासून जनतेचे संरक्षण व्हावे, जनतेत जनजागृती व्हावी या दृष्टी कोणातून सामाजिक बांधिलकी जपत संपूर्ण गावात जंतू नाशक फवारणी करण्यात आल्याचे ग्रुपचे अध्यक्ष नरेंद्र वर्तक यांनी सांगितले. यावेळी नरेंद्र वर्तक-ग्रुप अध्यक्ष, प्रवीण पाटील,नयन वर्तक,सुजित म्हात्रे, उदयराज म्हात्रे,किशोर म्हात्रे, योगेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, संजय म्हात्रे, मनोज गावंड, सुरेश म्हात्रे,मछिंद्र म्हात्रे,नितीन म्हात्रे,घनश्याम वर्तक,बळीराम म्हात्रे, धर्मेंद्र म्हात्रे,आनंद म्हात्रे, महेश म्हात्रे, नितेश पाटील,रामानंद वर्तक आदी ग्रुपचे सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.जंतू नाशक फवारणी मुळे थोड्या प्रमाणात का होईना कोरोनाच्या प्रादुर्भावाला यामुळे आळा बसणार आहे. या ग्रुपच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी या कार्याची प्रेरणा घेऊन आपापल्या गावात जंतू नाशक फवारणी सुरु केली आहे.