महाड येथील पूरग्रस्तांना मदत.
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्ह्यातील महाड येथील पूरग्रस्तांना विविध जीवनावश्यक वस्तू, साहित्याचे वाटप करून उरण तालुक्यातील ग्रामस्थांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
देवेंद्र तांडेल, लखन तांडेल, मितेश तांडेल, स्वप्निल भोईर,चेतन रमेश कडू , जितेंद्र जगन्नाथ ठाकूर, हरेश्वर ठाकूर,समीर घरत, यतिश तांडेल, अजित पाटील, ,राहुल पाटिल,रोहित पाटिल,
प्रणय म्हात्रे,प्रशांत ठाकूर,योगेश कोळी,चेतन ठाकूर ,कृष्णा पाटील ,सुरज कोळी आदी उरण तालुक्यातील तरुणांनी आपली सामाजिक बांधिलकी जपून पूरग्रस्तांना मदत केली. साई संजीवनी ग्रुप करंजा यांच्या तर्फे 120 किट देण्यात आले.व इतर ठिकाणाहून जमलेल्या आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदतीने 130 किट असे एकूण 250 किट महाड मधील माझेरी पुढची वाडी,माझेरी मागची वाडी,परमाची वाडी, महाड सिटी पंचशील नगर , कावे आली महाड , वरंध आदिवासी वाडी, तलीये मधली वाडी येथे पूरग्रस्तांना देण्यात आले.