महेंद्र घरत यांच्या हस्ते आयाज फकिह यांचा सत्कार.
उरण दि 20(विठ्ठल ममताबादे )कोरोना काळात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल उरण मधील रिक्षा चालक, सामाजिक कार्यकर्ते तथा उरण तालुका काँग्रेसचे माजी अल्पसंख्यांक अध्यक्ष आयाज फकिह यांचा सत्कार उरण शहरातील काँग्रेस कार्यालयात कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ देऊन करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, उरण तालुकाध्यक्ष जे डी जोशी, किरीट पाटील, रेखा घरत,निर्मला पाटील,प्रकाश पाटील, अफशा मुकरी,अमीना पटेल , चंदा मेवाती, शैलेश तामगाडगे,बबन कांबळे, अखलाक शिलोत्री, निलेश मर्चंडे,हेमंत पाटील, एल.टी.लवे, गुफरान तुंगेकर, रमेश टेमकर, रविंद्र मढवी, विवेक म्हात्रे यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
कोरोनाच्या पहिल्या दिवसापासुन गरजू व्यक्तींना सामाजिक कार्यकर्ते आयाज फकिह हे आपल्या रिक्षा द्वारे मोफत सेवा देत आहेत. कोरोना पेशंट कडून तसेच गरजूकडून एकही रुपये न घेता त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत हि सेवा दिली आहे. आता ते लसीकरणासाठी मोफत प्रवासाची सेवा देत आहेत. ज्यांना ज्यांना लस घ्यायची आहे. अश्या अपंग, निराधार, आबाल वृद्धाना गरजू लोकांना ते मोफत सेवा देत आहेत.कोरोना काळात अत्यंत महत्वाची भूमिका आयाज फकिह यांनी बजावली आहे. सर्वांसाठी आयाज फकिह यांचे कार्य आदर्श, प्रेरणादायी आहे. खऱ्या अर्थाने आयाज फकीह हे कोरोना योद्धा आहेत.असे मत महेंद्र घरत यांनी यावेळी व्यक्त केले.
आज पर्यंत माझे अनेक सत्कार झाले आहेत.पण माझ्या घरी(काँग्रेस पक्षातर्फे )सत्कार झाल्याचे मला जास्त आनंद झाला आहे.असे मत व्यक्त करत उपस्थित सत्कार मूर्ती आयाज फकिह यांनी महेंद्र घरत व काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले.मला समाजसेवेची सुरवातीपासून आवड आहे. समाजसेवा केल्याने मला एक वेगळे समाधान, वेगळा आनंद भेटत असल्याने समाजासाठी आपणही कुठेतरी खारीचा वाटा उचलावा, त्यांची सेवा करावा या दृष्टी कोणातून आपण कार्यरत असल्याचेहि यावेळी आयाज फकिह यांनी सांगितले.