ट्रेलरच्या धडकेने गाडीतील तिघे जण जखमी
पनवेल दि.01 (वार्ताहर)- आपल्या ताब्यातील ट्रेलर बेदरकारपणे चालवून मारूती स्विफ्ट डिजायर गाडीस धडक देऊन केलेल्या अपघातात गाडीतील तिघे जण जखमी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील कल्ले गावाच्या हद्दीत घडली आहे.
ट्रेलरचालक गणेश घोरपडे हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर घेऊन तालुक्यातील कल्ले गाव येथून जात असताना त्याने मारूती स्विफ्ट डिजायर गाडीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात निखिल पाटील (वय-29), स्वाती पाटील (वय-50) व कैलास पाटील (वय-57) हे तिघे जखमी झाले आहेत. तसेच त्यांच्या गाडीचेही नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.