संदिप जाधव यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उरण शहर समन्वयक पदी निवड.
उरण दि 4(विठ्ठल ममताबादे )शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे व शिवसेना नेते युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री नामदार आदित्यजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नामदार एकनाथजी शिंदे ,खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार वंदनीय श्री बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या उरण शहर समन्वयक पदी शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक संदिप जाधव यांची निवड करण्यात आली आहे .त्याचे नियुक्ती पत्रक उरणचे माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी जिल्हा वैद्यकीय कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे, शिक्षक सेना कोकण कार्याध्यक्ष कौशिक ठाकूर,विभागप्रमुख एस के पुरो उपस्थित होते.संदीप जाधव शिवसेनेचे कडवट, निष्ठावंत शिवसैनिक असून त्यांच्या या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यावेळी संदीप जाधव यांनी सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने, प्रामाणिकपणे पार पाडून गोरगरिबांना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणार असल्याचे नवनियुक्त उरण शहर समन्वयक संदीप जाधव यांनी सांगितले.