महा रक्तदान शिबीराचे आयोजन.
उरण दि १६(विठ्ठल ममताबादे )शिवसाई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पागोटे तर्फे दरवर्षी विविध अध्यात्म,संस्कृती , शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. हे मंडळ गेली १८ वर्षे साखर चौथच्या दिनी गणपती बाप्पाचा उत्सव साजरा करीत आला आहे.केवळ मौजमजा करमणूक म्हणून बाप्पाची स्थापना न करता प्रत्येक मंडळाने विविध उपक्रम राबवले पाहिजे या उद्देशाने गेली १८ वर्षे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न म्हणून अनेक सामाजिक उपक्रम मंडळाने राबविले आहे.त्यातीलच जवळपास ७ वर्षे नियमित राबवित असलेला उपक्रम आणि सध्याच्या कोरोना काळात ज्याची नितांत गरज आहे असा उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर.यावर्षीही शनिवार दि २५ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ९:३०ते दुपारी ३ या वेळेत श्री काशीनगर चा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडप, पागोटे, तालुका उरण या ठिकाणी सद्गुरू चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.इच्छुक रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या शिबिरात रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधीलकी जपण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी इच्छुकांनी, नागरिकांनी 9930895476, 98702 25351 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.