आम्ही पिरकोनकर समूहाच्या वतीने ‘इको फ्रेंडली बाप्पा-२०२१’ स्पर्धेच्या विजेत्यांना व विशेष कामगिरी करणाऱ्यांना पुरस्कारांचे वितरण.
उरण दि २०(विठ्ठल ममताबादे )गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या लाडक्या बाप्पाचा सोहळा सामाजिक दृष्टीने आनंददायी व्हावा यासाठी ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या वतीने ‘इको फ्रेंडली बाप्पा-२०२१’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेअंतर्गत प्लास्टिक आणि थर्माकॉल विरहित सजावट, विघटनशील किंवा नैसर्गिक फुलांचा देखावा आणि कोविड सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर आधारित परीक्षण झाले.
‘पर्यावरण पूरक’ उत्सव ही संकल्पना समजून घेऊन त्याप्रमाणे सजावट करणे हे कौशल्याचे आणि मेहनतीचे काम होते. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी प्रामाणिकपणे स्पर्धेचे निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. चांगला प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत कु. श्रीयश महेश घरत यांना प्रथम क्रमांक, कु. रोशन लक्ष्मण गावंड द्वितीय व संकेत पद्माकर गावंड यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. या सर्व विजेत्यांंना ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाच्या वतीने गौरवण्यात आले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने समूहाने परिसरातील विशेष कर्तृत्व गाजवणाऱ्या व्यक्तींना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पिरकोन येथील तळ्यात बुडणाऱ्या महिलांना वाचवणाऱ्या कु. अधिकार कुंदन पाटिल व
कु. प्रतीत गौतम पाटिल (वशेणी) यांना ‘आम्ही पिरकोनकर शौर्य सन्मान’ पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला .त्याचबरोबर जिवाची पर्वा न करता कित्येक कोविड रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणाऱ्या अमित कमलाकर गावंड (पिरकोन) यांचाही शौर्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.