मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात
द्राक्षांचा टेम्पो मुंबईकडे निघाला असताना टेम्पोचा टायर निकामी झाल्यामुळे टेम्पो तील तिघे जण खाली उतरले असताना मागून येणाऱ्या प्रवासी बसने त्यातील एकाला धक्का दिला त्या धक्क्याने ती व्यक्ती जागीच ठार तर बस मधील काही प्रवाश्यांना किरकोळ जखमा आल्या असून जखमींना उपचारार्थ एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे हलवले तर मृत व्यक्ती चे शव शवविच्छेदनासाठी चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले आहे. यासाठी आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा वाहतूक पोलिस डेल्टा फोर्स लोकमान्य आरोग्यसेवा यांची मोलाची मदत मिळाली.