गोरठण बुद्रुक वावोशी फाटा येथे शिवजयंती उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा …
महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथी नुसार दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी केली. वावोशी येथे गेली १४ वर्षे शिवजयंती उत्सव साजरा केला जातो दिनांक २० व २१ मार्च या दोन दिवशी वावोशी येथे साजरा करण्यात आला असून सदर कार्यक्रमात तेथील शेकडो नागरिक व महिला वर्ग उत्साहाने सहभागी झाले . दिनांक २० मार्च रोजी रायगड भूषण रूपेश बुवा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सूरताल म्युझिकल ग्रुप व भजन मंडळ नारंगी यांनी श्रवणीय चाल आणि सुरेख वाद्यवृंदात भक्तीगीत भजन व पोवाडे सादर केले. रविवार दिनांक २० मार्च रोजी प्रशांत देशमुख यांनी शिवव्याख्यान सादर केले. २१ मार्च रोजी समरभूमी उंबरखिंड ते शिव स्मारक वावोशी पर्यंत धावती शिवज्योत आणण्याचा कार्यक्रम पार पडला. यात लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनी सहभाग घेतला. सकाळी नऊ वाजता माजी सरपंच श्री. राकेश जयराम जाधव यांच्या हस्ते जलाभिषेकाचा कार्यक्रम पार पडला लहान मुलांसाठी दुपारी विविध सांस्कृतिक स्पर्धा राबविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये अनेक लहान मोठ्या मुला-मुलींनी अगदी उत्साहात सहभाग दर्शविला. पोवाडे, भाषण, गायन, नृत्य इत्यादी विविध कला सादर केल्या. कोविल काळामध्ये ज्यांनी भरीव कामगिरी केली त्यांना कोविड पुरस्काराने सन्मानित केले. तसेच महिलांच्या मनोरंजनासाठी होम मिनिस्टर कार्यक्रम ठेवून महिलांना एक संधी उपलब्ध करून दिली त्यामध्ये महिलांना शिवप्रेमी मित्र मंडळ गोरठण बु. वावोशी फाटा यांच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या. अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला भेट दिली असून संध्याकाळी सहा वाजता पालखी सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात सुरू झाला. या सोहळ्यात सर्व महिलांनी वेगवेगळ्या पारंपारिक वेशभूषा करून सहभाग दर्शविला. शेकडो लोकांनी पालखी सहभाग घेतला डीजे च्या जोशात पालखी सोहळा पार पडला. व शेवटी शिव आरती करून सोहळा संपन्न झाला.