रस्त्यावरच आहे गॅरेज व्यवसाय; कारवाईची नागरिकांची मागणी
पनवेल दि.२० (वार्ताहर): खारघर परिसरात रोडवर गॅरेज चालविणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. संबंधितांवर अपघातजन्य परिस्थिती निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलपाडा खारघर परिसरात अनेक गॅरेज चालक रोडवर वाहने उभी करीत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन अपघातजन्य स्थिती निर्माण होत आहे. अनधिकृतपणे रोडवर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. पोलीस पथकाने बेलपाडा सेक्टर 3, कोपरा सेक्टर १० परिसरता रोडवर वाहने उभी केलेल्या गॅरेजचालकांवर रोडवर अपघात होईल, अशा धोकादायक स्थितीमध्ये वाहने उभी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापुढेही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.