इसम बेपत्ता
पनवेल दि २७,(संजय कदम ) : राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक इसम उलव्या च्या दिशेने निघून गेला तो अद्याप घरी न परतल्याने ते हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
लक्ष्मण विठ्ठल पाटील (वय ५२) उंची साडे पाच फूट, रंग सावळा, डोक्याचे केस काळे – पांढरे, अंगाने माध्यम असून त्याच्या अंगात पांढऱ्या फुल बाह्याचा शर्ट व काली फुल पॅन्ट घातलेली आहे तसेच पायात पांढरी साधी चप्पल आहे. त्यांना मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या इसमा बाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी – ०२२-२७४५२३३३ किंवा पोना नितीन आखाडे यांच्याशी संपर्क साधावा.
- फोटो – लक्ष्मण पाटील