शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
पनवेल, दि.26 ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे करण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवेसना पनवेल शहर शाखेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्याचप्रमाणे आजही बुधवार दि.27 जुलै 2022 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 2.30 वाजेपर्यंत शिवसेना शाखा पनवेल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून सदर रक्तदान शिबिरामध्ये युवकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी केले आहे.