पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग ड आणि अ मध्ये अतिक्रमण कारवाई
पनवेल,दि.9 : आयुक्त श्री. गणेश देशमुख यांच्या आदेशानूसार प्रभाग ‘ड’ मधील पनवेल रेल्वे स्थानकाच्या बाहेर तसेच नवीन पनवेल बाजूच्या फूटपाथवरती बसणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवरती महापालिकेने कारवाई केली. या फेरीवाल्यांमुळे फूटपाथवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती.
यावेळी जेसीबीच्या साहाय्याने अनधिकृतरित्या उभारलेल्या शेडवरती तोडक कारवाई करण्यात आली. तसेच फेरीवाल्यांचे सामान जप्त करण्यात आले. याचबरोबर काळुंद्रे आणि भिंगारी येथील रोडवरील अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली.
तसेच प्रभाग ‘अ’ खारघर मध्ये सेक्टर 34 मधील शीघ्र कृती दलाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला काही फेरीवाल्यांनी अनधिकृतरित्या पक्के शेड उभारले होते. या अनधिकृत उभारलेल्या दुकानांवर, शेडवरती महापालिकेच्यावतीने नुकतीच कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साहाय्याने इथे उभारलेली अनधिकृत दुकाने व शेड जमीनदोस्त् करण्यात आली.