क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक
पनवेल दि.२७ (वार्ताहर): क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्याने खारघरमधील एका महिलेची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडीट कार्ड डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून एका सायबर चोरट्याने खारघरमधील महिलेशी संपर्क साधला होता. तसेच तिच्या क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून देण्याचे आमिष दाखवत तिच्या क्रेडीट कार्डद्वारे ९८ हजार ९९९ व ५६ हजार असे दोन व्यवहार केले. तसेच या व्यवहाराचे ओटीपी मागून घेतले. त्यानंतर काही वेळात महिलेच्या खात्यातून दोन आर्थिक व्यवहार झाल्याचे मेसेज येताच आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले.