अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे आयोजित रक्तदान शिबिराला उत्तम प्रतिसाद.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )
रक्तदान सर्वश्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून उरण तालुक्यातील अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील उत्तम कबड्डीपटू, उत्तम खेळाडू स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक 30 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देऊळवाडी,विमला तलाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिराला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला. यावेळी 160 रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना काळात रक्ताची गरज प्रत्येकाला भासत आहे. शिवाय राज्यात अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्या पार्श्वभूमीवर रक्ताचा तुटवडा राज्यात भासत आहे. अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातून अनेक गरजूना रक्त उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अश्या उपक्रमांचे आयोजन करणे काळाची गरज असल्याचे मत अश्विन पाटील मित्र परिवाराचे पदाधिकारी सदस्य यांनी सांगितले. सदर शिबीर यशस्वी होण्यासाठी अश्विन पाटील मित्र परिवाराच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.