खांदेश्वर पोलीस ठाणे मध्ये महिला दक्षता सदस्यानी केला रक्षाबंधन साजरा
पनवेल /वार्ताहर :बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. मात्र सदैव ‘ऑन ड्युटी’ असलेल्या सैन्य दलातील जवान आणि पोलिस कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनासह इतर सण साजरा करता येत नाही. आज मंगळवारी रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून आज दि 21 ऑगस्ट 2021 रोजी खांदेश्वर पोलीस ठाणे अंतर्गत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. श्री देविदास सोनावणे, सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी, महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच खांदेश्वर महिला दक्षता सदस्या ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आज रक्षाबंधन कार्यक्रम पार पडला.
आपत्कालीन परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी अहोरात्र झटणारे आणि कायदा – सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांना वेळेचे बंधन नसते. समाजासाठी आपल्या भूमिका बजावताना अनेकदा पोलिसांना आपल्या कुटुंबियांना वेळ देणे शक्य होत नाही. अनेक सणवार त्यांना कुटुंबियांसोबत साजरे देखील करता येत नाहीत. दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक पोलिस गावाकडे असलेल्या बहिणीला भेटून सण साजरा करू शकत नाहीत, त्यामुळेच या दिवसाचे महत्व खूप आहे. दक्षता कमटीच्या सर्व सदस्यांनी या उपक्रमाचे कौतुक करीत सर्व पोलीस बांधवाना राख्या बांधून हा सण उत्साहात साजरा केला.

