श्री मौनी रामदासजी महाराज यांच्या हस्ते द्रोणागिरी येथे महाराष्ट्र स्वीट्स ऍण्ड फरसाण मार्टचे उदघाटन.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )मिठाई, बर्फी, फरसाण आदी खाद्य पदार्थाच्या उत्तम गुणवत्तेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्र स्वीट्स ऍण्ड फरसाण मार्ट या दुकानाचे उदघाटन देवकृपा (देव लझरिया ), शॉप नं 17, द्रोणागिरी सेक्टर 51येथे श्री श्री 1008श्री महामंडलेश्वर श्री मौनी रामदासजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भगवान सेवक, गणेश सेवक, सोहन सेवक, पुरुषोत्तम सेवक यांच्यासह काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर, भारतीय जनता पार्टीचे हितेश शहा, मनन पटेल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. द्रोणागिरी सेक्टर 51, देवकृपा येथे सुरु झालेल्या महाराष्ट्र स्वीट्स ऍण्ड फरसाण मार्टला विद्यमान आमदार महेश बालदी, भाजपा तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.