नगरसेवक राजू सोनी यांच्या मुले मोठी दुर्घटना टळली
पनवेल दि. १६ पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या तत्परतेमुळे मोठे वृक्ष रस्त्यावर पडून होणारी दुर्घटना टळली आहे . त्यांनी वेळीच अग्निशामक दलाला घटनास्थळी प्राचारण करून तो वृक्ष बाजूला काढला आहे .
पनवेल शहरातील प्रभाग क्र.१९ मधील एम.ई.सी.बी कार्यालया समोर असलेले मोठे झाड काल रात्री ८ वाजता अचानक मुख्य रत्यावर पडले. त्यामळे काही काळ रस्ता बंद झाला होता. याची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना येथील काही नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी दिली.त्यांनी तत्काळ तेथे जाऊन पाहणी केली त्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मदतीने बॅरीगेट लावून तेथील वाहतूक थांबवली व या बाबतची माहिती नगरसेवक राजू सोनी यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख , सभागृह नेते परेश ठाकूर , तसेच महानगरपालिकेतील संबधीत अधिकाऱ्यांना कळविले . यावेळी राजू सोनी यांच्या मदतीला कोळीवाड्यातील काही मुले सुद्धा धावली कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी राजू सोनी तेथे उभेच राहून होते तसेच पनवेल महानगर पालिकेचे अग्निशमन दलाचे अधिकारी अनिल जाधव यांच्याशी संपर्क साधून त्यांना व त्यांच्या पथकाला त्याठिकाणी बोलवले व पडलेले झाड बाजूला करण्यासाठी त्यांनी त्यांच्या यंत्रणाच्या सहाय्याने ह्या झाडांच्या फांद्या कापून रस्त्याच्या बाजूला करून दिल्या.त्यानंतर महानगरपालिकेचे सफाई कर्मचाऱ्यांना बोलवून या फांद्या बाजूला करून संपूर्ण रस्त्यावर झाडून रस्ता स्वच्छ केला. व वाहतूकीस मार्ग मोकळा केला.त्यामुळे येथिल नागरिकांनी नगरसेवक राजू सोनी यांचे कौतुक व आभार मानले आहेत .
फोटो – पडलेला वृक्ष

