*आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची नवी मुंबई पनवेल मध्ये चर्चा*
नेत्यांचे वाढदिवस पुस्तक तुला, मिठाई तुला, कपडे तुला करून केल्याचे आपण ऐकतो, मात्र नवी मुंबईतील उद्योगपती श्रीकृष्ण गोसावी यांनी आपल्या 40 वा वाढदिवस हा त्यांच्या स्टाफने वृक्ष तुला करून केला आणि येणाऱ्या प्रत्येकाला मित्राना कुंडी सकट झाडाचे रोप देऊन पर्यावरणपूरक असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे. तसेच त्यांनी आश्रम शाळेतील लहान मुलांना अन्नदान त्यांना खेळाच्या वस्तूंचे वाटप करत पूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवला. त्याचसोबत गोसावी यांनी वृक्षा रोपण सुद्धा केले. त्यांच्या वाढदिवसाला आणलेला केक वर सुद्धा पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला होता. या वाढदिवशी त्यांनी 1000 वृक्षांचे दानही केले.
ही घटना आहे नवी मुंबईतील उद्योगपती श्रीकृष्ण गोसावी यांच्या वाढदिवसाची. मित्र परिवार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन श्रीकृष्ण गोसावी यांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी टायगर ग्रुपचे पै.तानाजी भाऊ जाधव, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे महेशभैया डोंगरे पाटील, सागरभैया पाटील, आतिष चाहकर, निलेश चव्हाण बैर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा गायक शेखर गायकवाड यांच्यासह त्यांचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीकृष्णरावांना वृक्ष लावण्याचे आणि जोपासण्याचे भारी वेड आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे. त्यांनी आता पर्यंत असंख्य झाडे लावली आणि परिसरात सुद्धा झाडे लावणे त्याची देखभाल करणे हा त्यांचा आवडता छंद, मग त्यांचा वाढदिवस झाडांच्या रोपानी तुला करण्याची कल्पना पुढे आली आणि त्यांच्या दोन कर्मचारी शर्मिष्ठा आटकोरे प्राजक्ता केंडे आणि अजित दिघे यांनी यासर्व नियोजनाची जबाबदारी घेऊन, पनवेल च्या नेरे येथील ग्राम स्वराज्य समिती भानगर येथील वृद्धाश्रमातील लहान मुलांसोबत हॉल मध्ये हा आगळा वेगळा वाढदिवस संपन्न झाला. त्या लहान मुलांना गोसावी यांनी कॅरम, फुटबॉल, बॅट बॉल, चेस, बास्केटबॉलचे वाटप केल्यानंतर चेहऱ्यावर हसू उमटले. अशा या आगळ्या वेगळ्या वाढदिवसाची नवी मुंबई, पनवेल मध्ये चर्चा आहे.