प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संघटक संजय राजुळे यांच्या वाढदिवसानिमित्त ३०० जनावरांना चारा वाटप*
लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,महाराष्ट्र राज्य या संघटनेचे लातूर जिल्हा संघटक संजय राजुळे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री गुरू गणेश जीवराज जैन गोरक्षण गो शाळा लातूर येथील ३०० जनावरांना चारा वाटप करण्यात आला. संजय राजुळे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, पत्रकारिता, शैक्षणिक, आरोग्य आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. तसेच साप्ताहिक काल परिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक, सप्तफेरे वधू वर सूचक केंद्राचे संस्थापक, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हा संघटक अशा विविध संस्था व संघटनेत हिरिरीने सहभागी होऊन सामान्य जनतेच्या मदतीसाठी कायम पुढाकार घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संजय राजुळे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
याप्रसंगी लातूरचे एडिशनल एसपी अनुराग जैन, प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, डॉ कोलपुके, साप्ताहिक पत्रकार संघ लातूरचे अध्यक्ष रवीकिरण सूर्यवंशी, बसव सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष बालाजी अप्पा पिंपळे, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक धर्मवीर भारती, नागनाथ गीते, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे यांचेसह समृद्ध व्यापार वृत्तपत्राचे संपादक दत्तात्रय परळकर, उदगीरचे सुप्रसिद्ध व्यवसायिक गुरुनाथ माळेवाडे, विधी सल्लागार जितेंद्र पाटील व अमोल घायाळ सुवर्ण पुष्पचे संपादक किशोर जाधव आणि बसव सेवा संघाचे अमित पाटील, सुनील ताडमाडगे, अमित खराबे, विरेश कोरे, धैर्य कन्सल्टंटचे संभाजी तांदळे तसेच या कार्यक्रमासाठी सूत्रसंचालन गणेश परळे, सुरेश पवार, जितेंद्र सराफ, महादेव मददे, केशव येदले, भालचंद्र गुरव, सुनील इबितदार गोविंदा सांगवे महेश कलबुर्गे, माधव तरगुडे, बालाजी मिठेवाड, मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

