शिवसेना – भाजप युती चे सरकार सिडको विरोधात असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या नक्कीच सोडवतील- बांधकाम व्यावसायिक तुकाराम दुधे
पनवेल दि २१ : सिडको च्या अनेक समस्यांना या भागात विकास करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना सामोरे जावे लागत आहे, अनेक वेळा लाल फिती मध्ये कामाचे कागदपत्रे अडकून राहतात त्यामुळे अनेक बांधकाम व्यावसायिकांची सिडको च्या या अनागोंदी कारभारामुळे कामे खोळंबली असून सद्याचे शिवसेना – भाजप युती चे सरकार न्याय मिळून देतील व आमच्या समस्या सोडवतील असा ठाम विश्वास पनवेल परिसरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असलेले दुधे बिल्डर्स चे तुकाराम दुधे यांनी व्यक्त केला आहे.
सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या बांधकाम व्यवसायिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, याबाबत वेळोवेळी सिडकोच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुध्दा या समस्यांचे निराकरण होत नाही आहे शासन दरबारी सुध्दा या समस्या मांडण्यात आल्या आहेत, परंतु बांधकाम व्यावसायिकांच्या समस्याकडे कोणाला लक्ष देण्यास वेळ नाही आहे. सध्याच्या युतीच्या सरकारकडून आम्हाला पूर्ण अपेक्षा असून सिडको वसाहती मध्ये काम करते वेळी बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या समस्या हे सरकार जाणून घेईल आमच्या समस्या चे निराकरण करतील असा ठाम विश्वास तुकाराम दुधे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना व्यक्त केला आहे लवकरच संबंधित खात्यातील मंत्र्यांची भेट घेऊन आमच्या समस्या त्यांच्या समोर मांडू असेही तुकाराम दुधे यांनी यावेळी सांगितले.
फोटो – तुकाराम दुधे पत्रकारांशी चर्चा करताना