सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचनाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा
-जगदीश कुलकर्णी
महाराष्ट्र प्रतिनिधी / श्री संतोष आमले.
उरण मध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव दहा दिवसा ऐवजी दिड दिवसाचा.
पोलीस प्रशासनाला सहकार्य करत कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेऊन उरण मधील गणेशोत्सव मंडळाचा दहा दिवसा ऐवजी दिड दिवसाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प.
उरण दि 17(विठ्ठल ममताबादे)कोरोना रोगाचा वाढता प्रचार व गांभीर्य लक्षात घेता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे. समाजात शांतता नांदावी या अनुषंगाने महाराष्ट्र शासना तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आले. त्या अनुषंगाने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दि 13/8/2020 रोजी दुपारी 12 ते 12:30 दरम्यान उरण पोलीस ठाणे येथे पोलिस प्रशासनातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मार्गदर्शन करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उरण तालुक्यातील 14 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव 2020 मार्गदर्शक सूचनेनुसार गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन उरण मधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस प्रशासन व विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्यात एका संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांनी श्री गणेश मूर्तीचे आगमन व विसर्जन होणार नाही.ध्वनी /वाद्य संदर्भात मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून वाद्य, स्पीकर बाबत घेण्यात आलेल्या परवानगी नुसारच वापर करावा. श्री गणेश मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुटाच्या मर्यादित असावी. सार्वजनिक ठिकाणी गणेशमूर्तीचे प्रतिष्ठापना करू नये. कुठल्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्य शासन, पोलीस प्रशासनातर्फे, स्थानिक प्रशासनातर्फे देण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सूचनांचे वेळोवेळी पालन करण्यात यावे.आदी सूचना गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना केल्या.
कोरोना रोगाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस प्रशासनाला सहकार्य करत उरण मधील विविध गणेशोत्सव मंडळाने या वर्षीचा गणेशोत्सव दहा दिवसा ऐवजी दिड दिवसाचा साजरा करण्याचा संकल्प केला. यामध्ये देऊळवाडी सार्वजनिक गणेशात्सव मंडळ, जय शिवराय युवक मंडळ-कामठा,शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती चौक, राजे शिवाजी मित्र मंडळ कोटनाका, श्री सिद्धिविनायक गणेशोत्सव मंडळ सातरहाटी, श्री गणेशोत्सव मंडळ स्वामी विवेकानंद चौक, वाणीवाळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आदी उरण शहरातील गणेशोत्सव मंडळासह उरण तालुक्यातील विविध गणेशोत्सव मंडळांनी दहा दिवसा ऐवजी दिड दिवसाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला आहे.