रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या मध्यमातू हजारो रिक्षा चालकांना अन्न धान्यचे वाटप
प्रतिनिधी /महाराष्ट्र पनवेल श्री.संतोष आमले
. दानशुर वेक्तिमत्व म्हणून ओळख असणारे राजकारणाच्या पलीकडे विचार करणारे मा श्री रामशेठ ठाकूरसाहेब यांच्या संकल्पनेतून पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वा खाली पनवेल तालुक्यातील 60 हजार कुटूंबाना अन्न धान्य चे वाटप करण्यात येत आहे.लॉक डाऊन मुळे अनेकांचे व्यवसाय बंद झालेत, नोकऱ्या गेल्यात, त्यात पनवेल मधील रिक्षा चालकांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे. व्यवसाय ठप्प झाले आहे याचा विचार करून वंदे मातरम रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष:मा श्री. रवी नाईक यांनी पुढाकार घेऊन नवीन पनवेल, विचुंबे, उसर्ली, खांदा कॉलनी, पनवेल शहर, नेरे, अश्या विविध भागातील हजारो रिक्षा चालकांना अन्न धान्य चे वाटप करून रिक्षा चालकांना आधार देण्याचं काम रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या माध्यमातून श्री.रवी नाईक यांनी केले. विभाग अध्यक्ष: विजय दुद्रेकर व नाका अध्यक्ष राजपाल शेगोकार यांनी मेहनत घेतली या मुळे रिक्षा चालकांना अन्न धान्य मिळाले या बद्दल रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रवी नाईक यांचे पनवेल मधील रिक्षा चालकाने आभार मानले