नियमाचे पालन करून नागरिकानी केले विसर्जन.
प्रतिनिधी/ पनवेलश्री. संतोष आमले , दरवर्षी वाजत गाजत मोठया उत्साहात गणरायाला निरोप दिला जातो, परंतु जग भर कोरोनाच संकट पसरल्यामुळे यंदाचा गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा होताना पहिला मिळाला लॉक डाऊन शिथिल केले आहे परंतु काही कडक नियम लावण्यात आले आहे, नागरिक नियम पालन करत आपल्या आनंदाला आवर घालत गणेश उत्सव साजरा करताना पहिला मिळाले, गणरायाला कोरोनाच संकट लवकर दूर जाओ अशी प्रार्थना गणेश भक्त करत आहे. गणेश विसर्जन करण्यास 2-3 लोकच सोबत जाताना पहिला मिळाले नवीन पनवेल येथील विसर्जन घाटावर नागरिकांची गर्दी होऊ नये या करिता नदी पात्रा मध्ये नागरिकांना बंदी करण्यात आली असून नदी पात्राबाहेर ,कृत्रिम हौद तयार करण्यात आला आहे. पहिल्यादा गणेश मूर्तीच तिथे विसर्जन करून नंतर नदी पत्रात विसर्जन करण्यात येत आहे.