कष्टक-यांचा प्रतिनिधी बाबा कांबळे यांना विधानपरिषदेत सदस्य करा…..राहुल डंबाळे
प्रतिनिधी / श्री.संतोष आमले पिंपरी, पुणे (दि. 30 ऑगस्ट 2020) असंघटीत आणि कष्टकरी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी दबलेल्या, पिचलेल्या या ‘नाही रे’ वर्गाचा आवाज विधान भवनात उठला पाहिजे, म्हणून कष्टकरी कामगारांचे लोक प्रतिनिधी बाबा कांबळे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदावर नियुक्ती करावी, अशी राज्यातील असंघटीत कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, मालक यांची मागणी आहे. त्यासाठी राज्यातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने पन्नास हजार निवेदने माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षनेते राहूल डंबाळे यांनी दिली.
रविवारी (दि. 30 ऑगस्ट) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डंबाळे बोलत होते. यावेळी बाबा कांबळे, वाहतूक आघाडीचे अजिज शेख, समाजवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष रफिक कुरेशी, भिमा कोरेगाव सामाजिक संघर्ष समितीच्या अनिता सावळे तसेच विठ्ठल गायकवाड, लाला गायकवाड, सतिश कांबिये, रविंद्र साळवे, बळीराम काकडे, विनोद गायकवाड, अजय लोंढे, नितीन कसबे, संतोष ढमाले, ज्ञानेश्वर बोराटे, फारूक कुरेशी, सालार शेख, पोपट खांडेभराड, बाळासाहेब ढवळे असे विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
तत्पुर्वी फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणा-या विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी बाबासाहेब कांबळे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सुचक म्हणून राहूल डंबाळे यांनी ठराव मांडला आणि अनिता सावळे, विठ्ठल गायकवाड, अजय लोंढे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बोलताना राहूल डंबाळे म्हणाले की, सध्याची विधान परिषद म्हणजे ‘नापासांची शाळा’ आहे. विधान सभेत पराभूत झालेल्या व तिकीट न मिळालेल्यांना पक्षांच्या शिफारशींवर विधान परिषदेत घेण्यात येते. त्यामुळे सर्व सामान्यांचे प्रश्न, कष्टकरी, असंघटीत, घरेलू कामगार, बांधकाम कामगार रिक्षा चालक, मालक, टपरी, पथारी, फेरीवाले यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. या दुर्लक्षित नाही रे वर्गाची राज्यात वीस लाखांहून जास्त संख्या आहे. त्यांचा खरा प्रतिनिधी म्हणून बाबा कांबळे हेच सक्षम व्यक्ती आहेत. त्यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड होणे म्हणजे या वीस लाख नागरीकांचा सन्मान केल्या सारखे होईल. मागील 30 वर्षात एकाही कष्टकरी, असंघटीत कामगार नेत्याला विधान परिषदेत घेण्यात आले नाही. यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस राहूल गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिनिधीमंडळ निवेदन देणार आहे. तसेच विभागीय स्तरावर सात मेळावे घेण्यात येणार आहेत.
यावेळी बाबा कांबळे यांनी सांगितले की, मी कष्टकरी कामगार पंचायत; महाराष्ट रिक्षा पंचायत; टपरी, पथारी, हातगाडी पंचायत; हमाल, माथाडी मजूर पंचायत; अंगणवाडी कर्मचारी महिला सभा; बांधकाम कामगार पंचायत, ऑटो रिक्षा चालक मालक, संघटना संयुक्त कृती समिती; नॅशनल हॉकर्स फेडरेशन; ऑटो रिक्षा टॅक्सी जॉईन्ट नॅशनल ॲक्शन कमिटी या संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळी पर्यंत मी कष्टकरी व असंघटीत कामगारांचे प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केली. वेळप्रसंगी तुरूंगात जावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ‘बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून कोरोना काळात नोंदणीकृत कामगारांना पहिल्या महिन्यात प्रत्येकी दोन हजार आणि नंतरच्या महिण्यात तीन हजार रुपये देण्यासाठी शासनाने मंजूरी दिली. तसेच घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा करीत आहे. रिक्षा, चालक, मालकांना पेन्शन मिळावी, टपरी, पथारी, फेरीवाले यांचे प्रश्न सोडविले जावेत. नॅशनल हॉकर्स पॉलिसी 2004 च्या आधारे देशातील पहिला कायदा पीसीएमसी मध्ये केला. आता केंद्र सरकारने केलेल्या फेरीवाला हॉकर्स पॉलीसी नुसार सर्वांना लाभ मिळावेत यासाठी लढा उभारायचा आहे. यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे, असेही बाबा कांबळे यांनी सांगितले.पिंपरी, पुणे (दि. 30 ऑगस्ट 2020) असंघटीत आणि कष्टकरी कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत. त्यासाठी दबलेल्या, पिचलेल्या या ‘नाही रे’ वर्गाचा आवाज विधान भवनात उठला पाहिजे, म्हणून कष्टकरी कामगारांचे लोक प्रतिनिधी बाबा कांबळे यांची राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य पदावर नियुक्ती करावी, अशी राज्यातील असंघटीत कामगार, घरेलू कामगार, रिक्षा चालक, मालक यांची मागणी आहे. त्यासाठी राज्यातील विविध संस्था, संघटनांच्या वतीने पन्नास हजार निवेदने माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती रिपब्लिकन युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्याचे पक्षनेते राहूल डंबाळे यांनी दिली.
रविवारी (दि. 30 ऑगस्ट) पिंपरी येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डंबाळे बोलत होते. यावेळी बाबा कांबळे, वाहतूक आघाडीचे अजिज शेख, समाजवादी पक्षाचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष रफिक कुरेशी, भिमा कोरेगाव सामाजिक संघर्ष समितीच्या अनिता सावळे तसेच विठ्ठल गायकवाड, लाला गायकवाड, सतिश कांबिये, रविंद्र साळवे, बळीराम काकडे, विनोद गायकवाड, अजय लोंढे, नितीन कसबे, संतोष ढमाले, ज्ञानेश्वर बोराटे, फारूक कुरेशी, सालार शेख, पोपट खांडेभराड, बाळासाहेब ढवळे असे विविध संघटनांचे प्रतिनिधी हजर होते.
तत्पुर्वी फुले, शाहू, आंबेडकर चळवळीत काम करणा-या विविध संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. यावेळी बाबासाहेब कांबळे यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करणारा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सुचक म्हणून राहूल डंबाळे यांनी ठराव मांडला आणि अनिता सावळे, विठ्ठल गायकवाड, अजय लोंढे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी बोलताना राहूल डंबाळे म्हणाले की, सध्याची विधान परिषद म्हणजे ‘नापासांची शाळा’ आहे. विधान सभेत पराभूत झालेल्या व तिकीट न मिळालेल्यांना पक्षांच्या शिफारशींवर विधान परिषदेत घेण्यात येते. त्यामुळे सर्व सामान्यांचे प्रश्न, कष्टकरी, असंघटीत, घरेलू कामगार, बांधकाम कामगार रिक्षा चालक, मालक, टपरी, पथारी, फेरीवाले यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. या दुर्लक्षित नाही रे वर्गाची राज्यात वीस लाखांहून जास्त संख्या आहे. त्यांचा खरा प्रतिनिधी म्हणून बाबा कांबळे हेच सक्षम व्यक्ती आहेत. त्यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून निवड होणे म्हणजे या वीस लाख नागरीकांचा सन्मान केल्या सारखे होईल. मागील 30 वर्षात एकाही कष्टकरी, असंघटीत कामगार नेत्याला विधान परिषदेत घेण्यात आले नाही. यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय सरचिटणीस राहूल गांधी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रतिनिधीमंडळ निवेदन देणार आहे. तसेच विभागीय स्तरावर सात मेळावे घेण्यात येणार आहेत.
यावेळी बाबा कांबळे यांनी सांगितले की, मी कष्टकरी कामगार पंचायत; महाराष्ट रिक्षा पंचायत; टपरी, पथारी, हातगाडी पंचायत; हमाल, माथाडी मजूर पंचायत; अंगणवाडी कर्मचारी महिला सभा; बांधकाम कामगार पंचायत, ऑटो रिक्षा चालक मालक, संघटना संयुक्त कृती समिती; नॅशनल हॉकर्स फेडरेशन; ऑटो रिक्षा टॅक्सी जॉईन्ट नॅशनल ॲक्शन कमिटी या संस्थांच्या माध्यमातून स्थानिक पातळीपासून राष्ट्रीय पातळी पर्यंत मी कष्टकरी व असंघटीत कामगारांचे प्रश्नांसाठी अनेकदा आंदोलने केली. वेळप्रसंगी तुरूंगात जावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे ‘बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडून कोरोना काळात नोंदणीकृत कामगारांना पहिल्या महिन्यात प्रत्येकी दोन हजार आणि नंतरच्या महिण्यात तीन हजार रुपये देण्यासाठी शासनाने मंजूरी दिली. तसेच घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या वतीने लाभ मिळावा यासाठी पाठपुरावा करीत आहे. रिक्षा, चालक, मालकांना पेन्शन मिळावी, टपरी, पथारी, फेरीवाले यांचे प्रश्न सोडविले जावेत. नॅशनल हॉकर्स पॉलिसी 2004 च्या आधारे देशातील पहिला कायदा पीसीएमसी मध्ये केला. आता केंद्र सरकारने केलेल्या फेरीवाला हॉकर्स पॉलीसी नुसार सर्वांना लाभ मिळावेत यासाठी लढा उभारायचा आहे. यासाठी मी प्रमाणिक प्रयत्न करणार आहे, असेही बाबा कांबळे यांनी सांगितले.