भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त फौजी समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात उत्साहात स्वागत.
प्रतिनिधी श्री. संतोष आमले/ पनवेल : पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे १६ वर्षांनी भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून निवृत्त झाले,त्यांचे गावात जल्लोषात स्वागत झाले,त्यानिमित्ताने ग्रामस्थांच्यावतीने फौजी समीर दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी झालेल्या स्वागत सोहळ्यात क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांच्या हस्ते समीर दुंदरेकर सत्कार यांचा करण्यात आला या सोहळ्यात समीर दुंदरेकर यांच्या सर्व कुटुंबीयांतर्फे केक कापून स्वागत करण्यात आले. यावेळी माजी सरपंच संजय म्हात्रे, विठू गोवारी, नंदकुमार भगत, रवी भोईर, पुरुषोत्तम भोईर, रवी म्हात्रे, सुनील तुपे,मिलिंद पोपेटा, राजे प्रतिष्ठान रायगड जिल्हा संघटक प्रमुख केवल महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुंदरेकर, सचिन दुंदरेकर आदी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना समीर दुंदरेकर यांनी सांगितले कि मी देशसेवा करताना मला माझ्या गावाचा आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझी देशसेवा जरी सुखरूप झाली असली तरी, काही प्रसंगांना मला सामोरे जावे लागले आहे. आज युवा पिढीमध्ये देशाभिमान वृद्धिंगत होण्याची गरज आहे. या स्वागत सोहळ्याप्रसंगी देशभक्तीपर गीताने सारे वातावरण चैतन्यमय झाले होते. या समारंभात समीर दुंदरेकर यांचे भाऊ सचिन दुंदरेकर यांनी पनवेल महानगरपालिकेत कोरोना काळात चांगल्या प्रकारे सेवा बजावली असल्याचे असल्याने त्यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या समारंभाचे सूत्रसंचालन प्रविण मोहोकर यांनी केले.