सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत युवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश
प्रतिनिधी/पनवेल : आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालय येथे पनवेल विभागातील अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. गेल्या काही महिन्यापासून पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सतीश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला, पुरुष आणि विशेष करून युवकांचे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करण्याचा ओघ पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये चालू आहे. त्याचीच पुढची पायरी म्हणून आज सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव श्री संदीप म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आणि पनवेल विधानसभा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुनील ढेंबरे, पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर व पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अनुराग गायकवाड विधानसभा राष्ट्रवादी युवक सचिव प्रभाकर फडके यांच्या सहकार्याने ऋषिकेश बाेलाडे ( महालुंगी), सुरज म्हात्रे (भोकरपाडा), भावेश गडकरी(आंबिवली), संदीप म्हात्रे (देवीचापाडा) अजीम खान सलामत खान यांच्यासोबत असंख्य तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत युवकांनी आदरणीय शरद पवार साहेब यांचा विकासाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविण्याच्या निर्धार केला. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी सर्व युवकांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या सर्व प्रवेश करणाऱ्या युवकांचे स्वागत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केले.