कु. हर्षिती कविराज भोईर हिचा वर्ल्ड बुक ऑफ , इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ,आशिया बुक ऑफ रेकॉर्ड
पनवेल/वार्ताहर: वय वर्षे अवघे साडेतीन असताना केलेल्या ट्रेक ची सुरुवात आज एवढी पुढे गेली आहे की अवघ्या साडेपाच वर्षात आपल्या नावावर ०२ रेकॉर्ड ची नोंद करून आपलं आणि आपल्या गावाचं नाव पूर्ण देशात गाजवल आहे.
नाव:- हर्षिती कविराज भोईर. वय वर्षे अवघे पावणे सहा. राहणार भेंडखळ – उरण.
आत्ता पर्यंत जवळ जवळ २४-२५ ट्रेक करून बाल वयातच आपले उद्दिष्ट लोकांच्या नजरेत भरवून ठेवलं.
वयाच्या अवघ्या साडेचार व्या वर्षी दिनांक ०८ जून २०१९ रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखला जाणारा कळसूबाई शिखर सर करून आपलं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच आशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आणि दिनांक २६ जानेवारी २०२० रोजी अवघ्या १२ तासात महाराष्ट्रातील तब्बल ०५ ( श्रीवर्धन गड , मनरंजन , लोहगड, विसापूर, आणि तिकोना) किल्ले सर् करून आपलं नाव वर्ल्ड बुक ऑफ मध्ये आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं आहे.