डी वाय पाटील रुग्णालयात व्हेंटिलेटर विभागाकडे दुर्लक्ष :श्री. संजयजी पवार चिटणीस:भाजपायुमो ठाणे पालघर जिल्हा
बेलापूर/ वार्ताहर : महानगरपालिका प्रशासन व डी वाय.पाटील रुग्णायात मध्ये कोव्हीड रुग्णा बाबत झाला आहे. या करारानुसार प्रत्येक महिन्याला 2.88 कोटी रुपये मनपा डी वाय पाटील रुग्णालयाला देणार आहे त्याबद्दल वाय पाटील कोव्हीड रुग्णांची सेवा करणार आहे. डी वाय पाटील रुग्णालयात सुरू करण्यात आलेले व्हेंटिलेटर विभागात इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टरांची गरज असताना त्याठिकाणी इंटेन्सिव्हिस्ट डॉक्टर ठेवला नाही याठिकाणी नवशिके डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात व मागील आठवड्यामध्ये बुधवारी दुपारच्या वेळेस सुमारे पंधरा ते वीस मिनिटं व्हेंटिलेटर सेवा बंद पडली होती अशाप्रकारची दुःखद बातमी भारतीय जनता पार्टीचे ठाणे पालघर जिल्ह्याचे चिटणीस श्री संजय पवार कळताच याची गंभीर दखल घेऊन नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त यांना पत्र लिहून सदर प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन याकडे जातीने लक्ष घालून योग्यती कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली