ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन ने सिफेरर्स ना लाखाे रूपयांची मदत सीआरफेअर्स वेलफेयर फंड सोसायटीकडून करून दिली.
पनवेल / वार्ताहर :2020 च्या डीजीएस परिपत्रक क्रमांक 01 नुसार ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन ने बर्याच सिफेरर्स ज्यांना किंवा त्यांच्या परिवारांना काेवीड ची लागण झाली किंवा काेवीड मूळे ज्या सिफेरर्स ना किंवा त्यांच्या फॅमिली ना मरणागती पत्कारावी लागली अशा बर्यांच सिफेरर्स ना लाखाे रूपयांची मदत सीआरफेअर्स वेलफेयर फंड सोसायटीकडून करून दिली.बरेच अशे प्रलंबित अर्ज अजून यूनियन कडे प्राप्त झाले असून यूनियन चे अध्यक्ष संजय वा. पवार व कार्याध्यक्ष अभिजीत दि. सांगळे हे प्रयत्नशील आहे व सिफेरर्स च्या हक्कासाठी व त्यांना न्याय देण्यासाठी तत्पर आहे.
ॲाल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन आव्हान करते की ज्या काेणां सिफेरर्स ना किंवा त्यांच्या परिवाराला काेराेनाची लागण झाल्यास त्यांनी या डीजी शिपींग च्या ०१ ॲाफ २०२० च्या नियमावली नूसार नेमून दिलेल्या फंड चा पुरेपूर फायदा घेण्यासाठी यूनियन शी संम्पर्क साधा यूनियन त्यांना ताे फंड मिळवून देण्यास मदत करेण.
आपणा सर्वांची साेबत ही आमची ओळख आणि विश्वास हे आमचे प्रमाणपत्र आहे.