श्रीमंत छत्रपती मा. खासदार उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठानमध्ये पनवेल तालुक्यातील तरुण कार्यकर्ते सामील.
पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींच्या हृदयात श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्थान कायम आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज उदयनराजे भोसले महाराज यांची तरुणांसह सर्वच वर्गात असलेली क्रेज पाहता व पनवेल – रायगड येथील राजे प्रतिष्ठानतर्फे सुरु असलेले सामाजिक, राजकीय कार्य पाहता तरुणांचा कल राजे प्रतिष्ठानकडे वाढत चालला आहे. राजे प्रतिष्ठानचे रायगड जिल्हा संघटक केवलदादा महाडिक यांची काम करण्याची पद्धत व प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा स्वभाव यामुळे राजे प्रतिष्ठानने आज संपूर्ण रायगड जिल्ह्यासह नवी मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर मुसंडी मारली आहे. राजे प्रतिष्ठान ही एक सामाजिक संघटना असून सामाजिक प्रश्न सोडविण्याकडे त्यांचा अधिक कल आहे. राजे प्रतिष्ठानच्या याच कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून छत्रपती मा. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्ष असलेल्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे अध्यक्ष जितेंद्र खानविलकर उर्फ काकासाहेब, महाराष्ट्र संघटक अशोक शिगवण उर्फ अच्चूभाई तसेच महाराष्ट्र उपाध्यक्ष राजू मरे, नारायण कोळी, मुंबई संघटक प्रमुख चंद्रकांत धडके (मामा) व मुंबई अध्यक्ष प्रकाशभाई कोळी यांच्या मार्गदर्शनाने व रायगड जिल्हा संघटक केवलदादा महाडिक यांच्या नेतृत्वाने आज नवीन पनवेल, उसर्ली, नेरे, कामोठे, रसायनी – जासई, डावरे व इतर गावातील तरुणांनी आज राजे प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला. यावेळी सौरभ मछिंद्र पाटील याला नवीन पनवेल उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. यावेळी आम्ही राजे प्रतिष्ठानचे कार्य गावोगावी पोहचवून महाराजांना अभिप्रेत कार्य करूअसे पाटील यांनी बोलताना सांगितले. यावेळी रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक, ओमकार महाडिक, अमित पंडित यांच्यसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.