सामनाचे डॅशिंग पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस साजरा ;
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आल्या शुभेच्छा
पनवेल, दि.14 (वार्ताहर) ः पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष संजय कदम यांच्या जन्मदिनानिमित्त संघटनेच्यावतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. संजय कदम सामना चे पत्रकार असून गेली अनेक वर्षे प्रभावी पत्रकारिता करत आहेत. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी संस्थेचे सल्लागार सुनील पोतदार यांच्या कार्यालयात जन्मदिन साजरा करण्यात आला.
संस्थेचे सरचिटणीस मंदार दोंदे यांनी प्रास्ताविकातून पत्रकार संजय कदम यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की पत्रकारितेतील ज्येष्ठांना उचित सन्मान देणारे तर निवेदीतांना परिपूर्ण मार्गदर्शन करणारे संजय कदम हे अतिशय संतुलित पत्रकार आहेत. केवळ पत्रकारिता क्षेत्रातीलच नव्हे तर समाजातील प्रत्येक घटका सोबत मिळून मिसळून व आपुलकीने वागणारे हे व्यक्तिमत्व प्रत्येकालाच हवेहवेसे वाटते. संघटनेचे सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील व सुनिल दादा पोतदार यांनी संजय कदम यांची लेखणी उत्तरोत्तर प्रगल्भ होत राहो, व तिला यशाची सोनेरी किनार जडत जावो असे आशिर्वाद दिले. तर अध्यक्ष निलेश सोनवणे यांनी संजय कदम यांची अशीच उत्तरोत्तर भरभराट होत राहो अशी सदिच्छा व्यक्त केली. संजय कदम यांनी असेच पत्रकार बांधवांचे प्रेम सदैव मिळत राहो असे म्हणत सर्वांचे आभार मानले. संजय कदम यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सरचिटणीस मंदार दोंदे, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार सुनीलदादा पोतदार, खजिनदार केवल महाडिक, माजी अध्यक्ष दीपक महाडिक, दै.रायगड नगरीचे संपादक राकेश पितळे, विशाल सावंत, संतोष सुतार, संतोष भगत, वैभव लबडे, प्रतिक वेदपाठक, ओमकार महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.