पनवेल महानगर पालिका कार्यालयातील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कोरोना योद्धांना प्रोत्साहन भत्ता तात्काळ द्यावा : राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांची प्रशासनाकडे पत्राद्वारे मागणी.
पनवेल / प्रतिनिधी : कोरोना महामारीच्या काळामध्ये वास्तविक पाहता कोरोनाच्या लढ्यात जे डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस आणि सफाई कर्मचारी तसेच वेळोवेळी रिपोर्ट बनवून कार्यालयाला अपडेट करणारे डेटा एंट्री ऑपरेटर यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रात्रंदिवस मेहनत घेतली आहे, या काळामध्ये त्यांना कोरोनाची बाधा देखील देखील झाली असेल यावेळी त्यांच्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असताना अशा प्रकारच्या सुविधा उपलब्ध केल्या जात नाही. त्यांना या कामाच्या बदल्यासाठी प्रोत्साहन भत्ता देणे अपेक्षित असून प्रोत्साहन भत्ता देणे तर दूरच पण रात्रदिवस काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ऐच्छिक का होईना, एक किंवा दोन दिवसाचे वेतन कपात करणे योग्य होणार नाही. यामुळे कोरोना युद्धात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष आहे. त्यांचे वेतन कपात न करता त्यांना प्रोत्साहनपर भत्ता देण्याबाबत पनवेल महापालिकेने गांभीर्याने विचार करावा. कोरोना काळामध्ये पनवेल महानगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीवर काम करणारे व रिपोर्ट बनवणारे डेटा एंट्री ऑपरेटर,कोरोनाची ड्युटी करणारे शिक्षक वर्ग, सफाई कामगार यांनी दिवसरात्र आपल्या घरादाराचा विचार न करता काम केले आहे. तरी पनवेल महानगर पालिका आयुक्तांनी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून कोरोना काळात काम करणाऱ्या पनवेल महानगर पालिका कार्यालयातील कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कोरोना योद्धांनाप्रोत्साहन भत्ता तात्काळ देण्यात यावा अशी मागणी श्रीमंत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे रायगड जिल्हा संघटक केवल महाडिक यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे.